कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्यास केंद्राचा नकार

February 11, 2011 1:37 PM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी

कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्याला केंद्राने नकार दिला आहे. बाजारातील अस्थिरतेमुळे कांद्याची निर्यातबंदी सुरूच राहिल अशी घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री आनंद शर्मा यांनी केली आहे. यासंबंधी तत्काळ निर्णय घेणं अशक्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राचे कृषी आणि पणनमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे आज आनंद शर्मा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आहेत. निर्यातबंदी उठवण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे ते मागणी करणार आहेत. पण अजुन त्यांची आनंद शर्मा यांच्याशी भेट झाली नाही. आज संध्याकाळ पर्यंत ही भेट घेऊन निर्यातबंदी उठवण्याची मागणी ते महाराष्ट्रातर्फे करणार आहेत.

नाशिक कांदा मार्केट बंदला संमिश्र प्रतिसाद

कांद्याच्या हमी भावावरुन अजूनही शेतकरी संतप्त आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व कांदा मार्केट आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कांद्यावरची निर्यातबंदी उठेपर्यंत सर्व मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय शेतकरी आणि व्यापार्‍यांनी घेतला होता. गुरुवारी नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजारात कांद्याचे लिलाव बंद राहिले. तर मनमाड, नांदगाव, पिंपळगाव या बाजार समित्यांमध्ये लिलाव झाले. पण भाव मात्र 6 ते 9 रुपये किलो एवढेच राहिले. संध्याकाळी शेतकरी संघटना लालसगावच्या शेतकर्‍यांची पिंपळगावला सभा घेवून जिल्ह्यातले सर्व बाजार, निर्यात बंदी हटवेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन करणार आहे. नाशिक शहरातील किरकोळ भाव आज 10 ते 15 रुपये किलो इतके होते. तसेच कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या गळचेपीला राज्य सरकारच जबाबदार आहे एकीकडे कांद्याला हमी भाव द्यायचा नाही पण दुसरीकडे दलाल आणि व्यापार्‍यांच हित साधायच अस धोरण राबवल जात आहे त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी केली आहे.

close