नाशिक कांदा मार्केट बंदाचा शेतकर्‍यांचा निर्धार कायम

February 11, 2011 3:11 PM0 commentsViews: 27

11 फेब्रुवारी

कांद्याच्या निर्यातीचा मुद्दा दिल्लीत पोचल्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, जोपर्यंत निर्यातबंदी मागे घेत नाहीत आणि कांद्याला 1500 रुपये किमान भाव मिळत नाही तोपर्यंत लासलगाव कांदा मार्केट सुरु न करण्याचा शेतकर्‍यांचा निर्धार कायम आहे. बुधवारपासून लासलगाव बाजार समितीमध्ये दाखल झालेला 1 हजार ट्रॅक्टर कांदा तसाच पडून आहे. पिंपळगाव, मनमाड, याठिकाणी आलेल्या 60-70 ट्रॅक्टर कांद्याची मात्र विक्री करण्यात आली. येवला, नांदूर शिंगोटे या उपबाजारसमित्यांमध्ये सुरु झालेले कांद्याचे लिलाव आजही बंद पाडण्यात आले. निर्यातबंदी मागे घेतली नाही तर सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला.

close