अण्णा हजारेंचा बेमुदत उपोषणाचा इशारा

February 11, 2011 3:24 PM0 commentsViews: 2

11 फेब्रुवारी

घोटाळेबाज सनदी अधिकार्‍यांना जेलची हवा खायला लावणारा कायदा करा अन्यथा एक एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरु करेन असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे. आदर्श हाऊसिंग सोसायटीसारखे घोटाळे बाहेर आले पण राजकीय नेते आणि सनदी अधिकारी अजून मोकळेच आहेत. कायद्यातल्या पळवाटांमुळेच अधिकारी आणि राजकारणी मोकळे आहेत असा आरोप अण्णांनी पुन्हा एकदा आज पुण्यात केला आहे. राळेगण सिध्दी इथं यासंदर्भात उद्या एक बैठक होणार आहे. या बैठकीत 15 मार्चपासून सुरू होणार्‍या अण्णांच्या राज्यव्यापी दौर्‍याची दिशा ठरवण्यात येईल. आजच्या पुणे दौर्‍यात पुण्याचे कलेक्टर चंद्रकांत दळवी यांच्या झिरो पेन्डन्सी या कार्यध्दतीची अण्णांनी माहिती घेतली. दफ्तर दिरंगाई थांबली तर भ्रष्टाचाराचे उच्चाटन होण्यास मदत होईल अशा शब्दात दळवी यांच्या कामाचे अण्णांनी कौतुक केलं.

close