शिवशक्ती – भीमशक्ती नव्या समीकरणाच भीमसैनिकांकडून स्वागत

February 11, 2011 4:39 PM0 commentsViews: 3

11 फेब्रुवारी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून रिपाईचे नेते रामदास आठवले यांची झालेली भेट आणि या भेटीनंतर सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी दिलेली शिवशक्ती – भीमशक्ती एकत्रीकरणाची हाक सद्या गावागावातील युतीचा आवाज घूमत असून या दोन शक्ती एकत्रित याव्यात अशी इच्छा आता शिवसैनिकांबरोबरच भीमसैनिकही उघडपणे व्यक्त करु लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंढरीतील युवा भीमसैनिकांनी शहरातील प्रमुख शिवाजी चौकात एक भव्य होर्डिग उभारुन या नव्या समीकरणाचे स्वागत केले आहे. त्यामुळे या दोन शक्ती एकत्रित येतील का यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा झडताना दिसत आहे.

close