पुण्यात बॉम्बच्या अफवेने खळबळ

February 11, 2011 5:57 PM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी

पुण्यातल्या बाणेर परिसरात आज बॉम्बच्या अफवेने खळबळ उडाली. बाणेर परिसरातल्या एका बँकेसमोर सकाळी बेवारस वस्तू मिळाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक त्या ठिकाणी दाखल झालं. त्यांनी शोध घेतल्यानंतर एका छोट्या मडक्यामध्ये वायर सदृश वस्तू असल्याचं त्यांना दिसलं. त्यानंतर ती वस्तू जवळच असलेल्या टेकडीवर नेण्यात आली. पण तपासानंतर यामध्ये काहीही नसल्याचे निष्पन्न झालं आहे. फक्त एका छोट्या माठाला वायर्स गुंडाळुन ठेवल्या असल्याचं यात समोर आलं आहे. कोणी हा खोडसाळपणा केला याचा तपासा आता पोलीस करत आहे.

close