पुणेकरांच्या सेवेत नव्या 650 व्होल्वो, धुळखात उभ्या !

February 11, 2011 6:03 PM0 commentsViews: 1

11 फेब्रुवारी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये बि.आर.टी.एस मार्गावरुन धावण्यासाठी तब्बल सहाशे पन्नास नव्या व्होल्वो बसेसची खरदी करण्यात आली आहे. नव्याने आलेल्या ह्या बस पि.एम.पि.एल च्या ताफ्यात दाखल होणार आहेत. खरेदी केल्या बसेसपैकी 15 बस पुण्यात दाखल झाल्या आहे. मात्र ह्या बस मागील पंधरा दिवसांपासून पिंपरीमधील नेहरुनगर डेपोत धुळ खात उभ्या आहेत. जवाहरलाल नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत खरेदी केलेल्या ह्या बसेस थेट बंगलोरवरून आणल्या आहेत. सर्व सेवा सुविधांयुक्त अश्या ह्या बसेस आहेत. मात्र केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी ह्या बसेस रस्तावर उतरविल्या जात नसल्याचा आरोप भाजपनं केला आहे. महापौरांनी मात्र हे आरोप फेटाळून भाजपावरच टीका केली आहे. बसेसचा प्रश्न जागेवरच आहे मात्र या मुद्यावरून राजकारण सुरू झालं आहे.

close