मुशर्रफ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

February 12, 2011 9:37 AM0 commentsViews: 6

12 फेब्रुवारी

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यात आलं आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येप्रकरणी रावळपिंडी अँटी टेररिझम कोर्टानं मुशर्रफना हे वॉरंट बजावलं आहे. भुत्तो यांच्या हत्याप्रकरणात मुशर्रफ आणि बैतुल्ला मसूद हे दोघेहीजण थेट संबंधित असल्याचे आढळलं आहे. भुत्तो यांची हत्या करण्यासाठी मुशर्रफ यांनी बैतुल्ला मसूद याला संधी उपलब्ध करुन दिल्याचे या प्रकरणातील चार्जशीटमध्ये म्हटलं आहे. या खटल्यात आता येत्या 19 तारखेला सुनावणी होणार आहे.

close