आऊटसोर्सिंगच्या संधी वाढतील – नासकॉम

November 5, 2008 10:38 AM0 commentsViews: 3

5 नोव्हेंबर, मुंबईअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बराक ओबामा यांची निवड झाली. मात्र आय.टी आणि इतर क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये चालणार्‍या आऊटसोर्सिंगच्या विरोधात ओबामा यांनी पूर्वी मत दर्शवलं होतं. यामुळे भारतीय आय.टी कंपन्या चिंतेत पडल्या आहेत. दरम्यान, नासकॉमचे अध्यक्ष गणेश नटराजन यांनी आऊटसोर्सिंगवर भारतातून अमेरिकेत नोकरी करणार्‍यांना काळजीचं कारण नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ' आऊटसोर्सिंग कमी होण्याऐवजी त्यातल्या संधी वाढतील ', असं नासकॉम अध्यक्ष गणेश नटराजन यांनी सांगितलं.विप्रोचे जॉईंट सीईओ गिरीश परांजपे यांनी मात्र आशावादी भूमिका घेतलीय. ओबामांचा कल ग्लोबलायझेशनकडे जास्त आहे तसंच अमेरिकन व्हिजाच्या मुद्यावरही ते फारसे ठाम राहणार नाहीत, असं परांजपे यांना वाटतंय.

close