जळगावमध्ये शेतकर्‍यांचे रास्ता रोको आंदोलन मागे

February 12, 2011 9:49 AM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारीजळगाव जिल्ह्यातल्या चोपडामधील अडावद इथं कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी केलेलं आंदोलन अखेर मागे घेतल आहे. आमदार जगदिश वळवी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. पण आश्वासन पूर्ण झालं नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. अडावत गावातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांची बर्‍हाणपूर-अंकलेश्वर हाय वे बंद पाडला होता.अडीच ते 3 हजार शेकर्‍यांनी कांदा रस्त्यावर टाकून निषेध नोंदवला. कांद्यावरची निर्यातबंदी उठवण्याबरोबरच हमी भाव मिळावा अशी त्यांची मागणी होती. कांद्याचे भाव कोसळल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं. सध्या ते मागे घेण्यात आले आहे.

close