‘आदर्श’साठी सीबीआयची सरकारकडे ऑफिसची मागणी

February 12, 2011 9:57 AM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारी

आदर्श घोटाळ्यातली कागदपत्रं ठेवण्यासाठी सीबीआयला जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे आदर्श घोटाळ्याचं कामकाज चालवण्यासाठी सीबीआयने राज्य सरकारकडे वेगळ्या जागेची मागणी केली आहे. या मागणीसाठी सीबीआयचे पोलिस अधिक्षक अभिन मोडक यांनी काल राज्याचे मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांची भेट घेतली. पण या भेटीमुळे मुख्य सचिवांचीच सीबीआयनं चौकशी केल्याच्या वावड्या उठल्या आहेत. त्यावर आदर्श प्रकरणी सीबीआयने आपली चौकशी केली नसल्याचे गायकवाड यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. तसेच आदर्श घोटाळ्याच्या कामाकाजासाठी सीबीआयला वेगळी ऑफिसची जागा राज्य सरकार देण्याच्या विचारात आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी आदर्श प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करणार्‍या जे.ए. पाटील आयोगाला राज्य सरकारने बीकेसीमध्ये तात्पुरत कार्यालय दिलं होतं. पण लवकरच दक्षिण मुंबईतल्या ओल्ड कस्टम हाउसमध्ये पाटील आयोगाला कायमस्वरुपी ऑफिस दिलं जाणार आहे अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

close