महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतली शरद पवारांची भेट

February 12, 2011 11:00 AM0 commentsViews: 1

12 फेब्रुवारी

सीमा भागामध्ये कर्नाटक इन्डस्ट्रिअल डेव्हलपमेंट बोर्ड आणि इतर सरकारी कामाकरिता मराठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी संपादीत करण्यात येत आहेत . या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीनं आंदोलन छेडलं आहे. आणि ह्याच संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीनं शरद पवारांची भेट घेतली. तेव्हा जमिन संपादीत न करण्याबाबत कर्नाटक सरकारवर दबाव आणू असं आश्वासन शरद पवारांनी दिलं.

close