मुळा -प्रवरा संस्थेच्या कर्मचार्‍याची आत्महत्या

February 12, 2011 11:35 AM0 commentsViews: 5

12 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा- प्रवरा वीज संस्थेचा कर्मचारी असलेल्या भाऊसाहेब गाढे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मुळा प्रवरा सहकारी वीज वितरण संस्थेचा परवाना रद्द केल्यावर संस्थेतल्या सोळाशे कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. त्यातूनच भाऊसाहेब यानी घरासमोरच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. नोकरी गेल्यानं आलेल्या नैराश्यामुळेच त्यांनी ही आत्महत्या केल्याचे गाढेंच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर 15 जणांच्या एकत्र कुटुंबाची जबाबदारी होती.

दरम्यान गाढेंच्या मृत्यूनंतर मुळाप्रवरा सहकारी संस्थेतल्या इतर कर्मचार्‍यांनी येत्या 15 फेब्रुवारीपासून सामूहिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. संस्थेतल्या सोळाशे कर्मचार्‍यांचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यांना सरकारी नोकरीत सामावून घ्यावं अशी त्यांची मागणी आहे.

close