चौदा टीमच्या सराव सामान्यापासून सुरुवात

February 12, 2011 12:12 PM0 commentsViews: 5

12 फेब्रुवारी

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या चौदा टीमच्या मिशन वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात झाली आहे. आणि आज या टीममध्ये प्रॅक्टिस मॅच खेळवली जात आहे. भारतीय उपखंडातल्या वातावरण आणि खेळपट्टयांशी जुळवून घेण्यासाठी या मॅच सर्वच टीमला महत्वाच्या ठरणार आहेत.

यापैकी पहिली मॅच रंगतेय ती श्रीलंका आणि नेदरलँड दरम्यान कोलंबोच्या सिंहली स्पोर्ट्स क्लब मैदानावर ही मॅच खेळवली जात असून श्रीलंकेनं पहिली बॅटिंग करत 350 रन्स केले आहेत. आणि याला उत्तर देताना नेदरलँडची अवघ्या 50 रन्समध्ये 4 विकेट गेल्या आहे. कोलंबोमधल्याच प्रेमदासा स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि केनियादरम्यान मॅच रंगत आहे. विंडीजसाठी प्रॅक्टिस मॅचच जड जाणार असं दिसतं आहे.

विंडिजनं 8 विकेट गमावत 253 रन्स केले आहे. आणि याला केनियानं दमदार उत्तर दिलं आहे.तर चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेची टीम आमने सामने आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या झिम्बाब्वेनं चांगली सुरुवात केली आहे. तर बांगलादेश आणि कॅनडादरम्यान चितगावमध्ये सुरु असलेल्या प्रॅक्टिस मॅचमध्ये बांगलादेशचं पारडं जड आहे. आजची पाचवी प्रॅक्टिस मॅच खेळवली जातेय नागपूरच्या जामठा मैदानावर न्यूझीलंड आणि आयर्लंड दरम्यान सुरु असलेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडची पहिली बॅटिंग सुरु आहे.

close