महापालिकेच्या विद्यार्थ्यांना वर्ल्ड कपच्या मॅच पाहण्याची संधी

February 12, 2011 1:05 PM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारी

वर्ल्ड कप दरम्यान 13 आणि 18 मार्चला वानखेडे स्टेडिअममध्ये महानगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना वर्ल्ड कपच्या मॅचेस मोफत पहाण्याची संधी मिळणार आहे. वर्ल्ड कपच्या 2 हजार प्रवेशिका पालिकेला मोफत मिळणार आहेत. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी एमसीएला विनंती केली होती. त्यानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशननं ही विनंती मान्य केली. आणि आता पालिका यातल्या प्रवेशिका शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटणार आहे.

close