वर्षभरानंतर नेपाळीच्या कुटुंबीयांना मदत निधी मिळाला

February 12, 2011 2:43 PM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारी

पुण्यात झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाला उद्या एक वर्ष पूर्ण होतं आहे. या बॉम्बस्फोटात तब्बल 17 निष्पाप नागरीकांचा बळी गेली होता स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांना शाषनाने 8 लाख रुपयाची मदत जाहीर केली होती, ती अनेकांना देण्यातही आली परंतू या स्फोटाचा पहीला बळी ठरलेल्या गोकुळ नेपाळीच्या कुटुंबीयांपर्यत ही मदत पोहचलीच नव्हती आय.बी.एन.लोकमत ने हे प्रकरण उघड करुन त्याचा पाठपुरावा केला होता. आय.बी.एन लोकमत ने केलेल्या पाठपुराव्या मुळे प्रशाषन खडबडुन जागं झालं आणी केवळ दोन दिवसात नेपाळी च्या कुटुबींया पर्यंत राज्य शासनाने जाहीर केलेला पाच लाख रुपयाचा निधी पोहचता केला आहे. हे केवळ आय.बि.एन लोकमतमुळे घडु शकलअशी भावना पुण्यातल नेपाळी संघटनेच्या अध्यक्षानी व्यक्त केली.

close