कोल्हापूरमध्ये मनसेनं विकला 5 रूपये किलो दराने कांदा !

February 12, 2011 3:01 PM0 commentsViews: 7

12 फेब्रुवारी

एकिकडे कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहे. अवघ्या 2-4 रुपये दराने शेतकर्‍यांकडून कांदा विकत घेतला जात आहे. दूसरीकडे ग्राहकांना मात्र अजुनही 20-25 रुपये दरानंच कांदा खरेदी करावा लागत आहेत. यावर मनसेने कोल्हापुरात आज अभिनव आंदोलन केलं. खरेदी विक्रीवर सरकारचे नियंत्रण नसल्यानंच हा प्रकार सुरू असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. सरकारने कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवावे. त्याचबरोबर नफेखोर व्यापार्‍यांच्या कारवाई करावी अशी मागणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यांनी कोल्हापुरातल्या मनसे कार्यालयात लोकांना 5 रुपये दरानं कांदा विकला.

close