स्पेक्ट्रम प्रकरणी रिलायन्स आणखी अडचणीत

February 12, 2011 3:26 PM0 commentsViews: 1

12 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम प्रकरणात एडीएजी ग्रुप आणखीनच अडचणीत येण्याची शक्यता आहे. शाहीद बलवा यानं डीबी ग्रुपशी संबंधित एक पत्र सीबीआयला लिहिलेलं पत्र सीएनएन-आयबीएनला मिळालं आहे. त्यानुसार रिलायन्स टेलिकॉमने त्याच्या कंपनीत गुंतवणूक केल्याचं स्पष्ट होतं आहे. त्याचमुळे त्याला टू-जी स्पेक्ट्रमचा परवाना मिळवण्यात मदत झाली होती. तसेच या पत्रात एडीएजी ग्रुपचे अधिकारी त्याच्या बोर्डवर असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतरच्या काळात एडीएजी ग्रुपने बलवाच्या कंपनीतील शेअर एका मॉरीशस कंपनीला विकले आहे. त्यामुळे आता सीबीआय ए. राजा यांचा काळा पैसा याच मॉरीशस कंपनीच्या माध्यमातून गुंतवला किंवा काय याचा शोध घेत आहे. दरम्यान एडीएजी ग्रुपने याप्रकरणी सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

close