मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ले.कर्नल पुरोहित यांना अटक

November 5, 2008 11:26 AM0 commentsViews: 7

5 नोव्हेंबर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं आणखी एकाला अटक केली आहे. प्रसाद श्रीकांत पुरोहित असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते लेफ्टनंट कर्नल आहेत. त्यांना कोर्टात हजर केलंय. एटीएसच्या प्रवक्त्यानं ही माहिती दिली. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी 26 जानेवारी 2008 रोजी फरिदाबाद, हरियाणामध्ये मीटिंग अटेंड केली होती. अभिनव भारतच्या अनेक मीटिंगला पुरोहित हजर होते. पुरोहित यांनी ट्रेनिंग देण्याचेही काम केलं आहे. या ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांनी आर्मी कोडचाही वापर केला होता. 11 एप्रिलला भोपाळच्या राममंदिरात अभिनव भारतच्या महत्वपूर्ण बैठकीत पुरोहित हजर होते.

close