पुण्यात किशोरीताई आमोणकर यांचा सत्कार

February 12, 2011 3:37 PM0 commentsViews: 6

12 फेब्रुवारी

शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल ज्येष्ठ शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचा पुण्यात खास सत्कार करण्यात येत आहे. 'सहेला रे' या कार्यक्रमाद्वारे किशोरीताईंना अनोखी मानवंदना दिली जात आहे. संगीतातील सर्व घराण्यांचे दिग्गज कलाकार यासाठी पुण्यात दाखल होत आहे. गणेश कलाक्रीडा मंच इथं आज आणि उद्या होत असलेला हा कार्यक्रम म्हणजे संगीत रसिकांकरता पर्वणीच ठरणार आहे. या कार्यक्रमाचे कौतुक करतानाच भारतीय अभिजात संगीत जपलं जावं अशी अपेक्षा किशोरीताईंनी व्यक्त केली. मात्र सध्याच्या संगीतातील भेसळीबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. सरकारने कलाकारांना केवळ पुरस्काराने गौरवण्याऐवजी संगीताच्या जपणूकीकरता, संवर्धनाकरता ठोस काम करावे असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं. सहेला रे कार्यक्रमात सहभागी होणार्‍या कलाकारांनीही किशोरी ताईंच्या सत्कारानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करतानाच हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांचं अभिनंदन केलंय.

close