व्हॅलेंटाईन डेला ‘लाडक्या गुलाबाचं’ प्रदर्शन

February 14, 2011 11:02 AM0 commentsViews: 5

14 फेब्रुवारी

प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचे प्रदर्शन धारावी येथे महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये भरवण्यात आले आहे. तब्बल 250 प्रकारचे रंगीबेरंगी गुलाब बघण्यासाठी मुंबईकरांनी एकच गर्दी केली होती. लाल, गुलाबी आणि पिवळ्या गुलांबाच्या गर्दीत मिनीएचर आणि हिरवा गुलाब भाव खाऊन जातो. मुंबईतल्या महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये रोझ सोसायटी तर्फे टवटवीत गुलाबांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या बहारदार प्रदर्शनाचं यंदा हे 42 वं वर्ष होतं. व्हेलन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर तरुण-तरुणींनी इथं गर्दी केली होती. त्याचबरोबर लहान मुलांनीही गुलाब बघण्याची मजा लुटली. गुलाबाच्या एका रोपामुळे 100 फुटाचे पर्यावरण शुद्ध राहतं. त्याचबरोबर जमीनीचं संवर्धनदेखील गुलाबांमुळे होतं असतं. गुलाबापासूनच तयार करण्यात येणार्‍या गुलकंद आणि गुलाब जलालाही मागणी असते.

close