पहिला स्वरभास्कर पुरस्कार लता मंगेशकर यांना प्रदान

February 12, 2011 4:28 PM0 commentsViews: 3

12 फेब्रुवारी

पुण्यात आज शनिवारी लता मंगेशकर यांना पहिला स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे हा पुरस्कार दिला गेला. पुण्यातल्या बागुल उद्यानामध्ये 'स्वरभास्कर भीमसेन जोशी' हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकार सितारादेवी यांच्या हस्ते लतादिदींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1 लाख 11 हजार 161 रुपय रोख आणि चांदीचं स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

close