पंढरपूरमध्ये एकादशीच्या सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी

February 14, 2011 11:21 AM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी

पंढरपूरमध्ये माघी वारी एकादशीच्या सोहळ्यासाठी राज्यभरातून सुमारे 3 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहे. एकादशीनिमित्त भाविकांनी चंद्रभागेमध्ये स्नान करुन विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पंढरपूरमधील मठ, मंदिर आणि धर्मशाळांमध्ये भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. ठिकठिकाणी भजन-किर्तनाचंही आयोजन करण्यात आलं आहे.

close