राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाला राष्ट्रपती आणि पंतप्रधान गैरहजर

February 12, 2011 5:00 PM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारी

34 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आज रांचीत उद्घाटन झालं खरं.. पण आता नव्या वादाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला येणं टाळलं आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण कॉमनवेल्थनंतर ते एकाकी पडलेत हेच या कार्यक्रमात दिसून आलं आहे. वास्तविक, प्रथेप्रमाणे या स्पर्धेचं उद्घाटन राष्ट्रपती किंवा पंतप्रधानांच्या हस्ते होतं. पण पंतप्रधान केरळच्या दौर्‍यावर आहेत.

close