लातूरमध्ये खंडणीसाठी मुलाची हत्या करणार्‍या चौघाना अटक

February 14, 2011 11:51 AM0 commentsViews:

14 फेब्रुवारी

लातूरमध्ये खंडणीसाठी जिल्हापरिषद सदस्याच्या मुलाचा खून करण्यात आला आहे. संशयितांनी चौकशीदरम्यान हे कबूल केलं आहे. 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र ती न मिळाल्यामुळे खून केल्याचं या आरोपींनी कबूल केलं आहे. जिल्हा परिषद सदस्य राम गायकवाड यांचा मुलगा शुक्रवारपासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह आज सापडला. राम गायकवाड यांचा मुलगा नववीत शिकत होता. त्याच्या मित्रांनीच त्याची हत्या केल्याचं आज उघड झालं आहे. या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यातील तलावामध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

close