सिद्धीविनायक मंदिराची संरक्षक भिंत तोडावी याचिका कोर्टाने फेटाळली

February 14, 2011 11:53 AM0 commentsViews: 6

14 फेब्रुवारी

मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिराची संरक्षक भिंत तोडावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. पण कोर्टानं ही याचिका फेटाळली आहे. संघराज रुपवते यांनी ही याचिका दाखल केली होती. या परिसरातील रहिवाशांचा या संरक्षक भिंतीला विरोध आहे. यापूर्वी हायकोर्टानंही या रहिवाशांची याचिका फेटाळून लावली होती.

close