सचिनची गणेश टेकडी मंदिराला भेट

November 5, 2008 11:35 AM0 commentsViews: 15

5 नोव्हेंबर नागपूर,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नागपूरच्या गणेश टेकडी मंदिराला भेट देऊन गणपतीचं दर्शन घेतलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सिरीजमधली शेवटची टेस्ट मॅच नागपुरात होणार आहे. त्यासाठी टीम इंडिया नागपुरात सराव करतेय. ज्या ज्या वेळी सचिन मॅच खेळायला नागपुरात येतो. त्या त्या वेळी मॅचच्या एकदिवस आधी तो या मंदिरात आपली हजेरी लावतो. 1998 साली नागपुरात झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये सचिनने 179 रन्स केले होते. या मंदिरातील गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मॅचमधला परफॉर्मस चांगला होतो असं सचिनचं मत आहे.

close