मी प्रेमात पडलो नाही…प्रेमात उभा राहिलो !

February 14, 2011 12:08 PM0 commentsViews: 7

अलका धुपकर, मुंबई

14 फेब्रुवारी

आपला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड असणे किंवा रिलेशनशिपमध्ये असणे या गोष्टींचं महत्व व्हॅलेंटाईन डेला अधिक वाढतं. पण या सगळ्यामध्ये तितकीच महत्वाची असते ती कमिटमेंट. सनी पवार ची कहाणी आपल्याला कमिटमेंटचा खरा अर्थ समजावते.

सनी पवार आणि आरती मकवानाच्या प्रेमाची ही अजब कहाणी आहे. अजब यासाठी कारण, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाल्यावर फक्त आठच महिन्यात आरतीचा अपघात झाला होता. ती कोमात गेली. आरती कधीच पूर्वीसारखी होणार नाही हे ठाऊक असूनही तब्बल तीन वर्ष 10 महिने सनीने आरतीची सुश्रुषा केली. स्वत:चं शिक्षण, करिअर, कुटुंब सगळे बाजूला ठेऊन सनी आरतीसोबत राहिला. मात्र सप्टेंबर 2006 पासून कोमात असलेली आरती अखेर 15 जून 2010 ला सनीला सोडून गेली. कायमची.

आरती आता नाहीये मग सनी आणि आरतीची कहाणी आम्ही तुम्हाला का सांगतोय असं तुम्हाला वाटेल. पण सनी आणि आरतीच्या प्रेम कोणत्याही नात्याच्या बंधनात अडकलं नव्हतं. पण सनीने निभावलं ते प्रेमाचं नातं. आजही तो या जिवाभावाच्या प्रेमाचे ऋणानुबंध निभावत आहे. पण सनी म्हणतो की, आरती खूप काही मागे ठेऊन गेली आहे. मी इतकचं सांगेन प्रेमात पडू नका,उभे राहा. आरतीचा अपघात होण्या आधी सीए शिकणारा सनी आता सोशल वर्क मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. आरतीने दिलेली प्रेमाची देणगी त्याला माणुसकीतून पुढे न्यायची आहे.

close