धुळ्यात आदिवासींच आंदोलन मागे

February 12, 2011 3:11 PM0 commentsViews: 2

12 फेब्रुवारी

गेल्या 48 तासांपासून धुळ्याच्या जिल्हाधिकार्‍यांसोबत चाललेल्या आदिवासींच्या चर्चेला शेवटी पूर्णविराम मिळाला आहे. वनजमिनीचा हक्क, रेशन आणि रोजगार या मागण्यांसाठी 4 हजार आदिवासी गुरुवारपासून धुळ्याच्या कलेक्टरना भेटायला आले होते. सत्यसोधक कष्टकरी संघटनेच्या वतीने 80 किलोमीटर पायी यात्रा करत त्यांनी बिर्‍हाड मोर्चा काढला होता. गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली मांडून संसार थाटले होते. शेवटी त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे ठोस आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

close