जुन्नरच्या पिंपळगाव-जोगा धरणात 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

February 14, 2011 1:18 PM0 commentsViews: 7

14 फेब्रुवारी

पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील पिंपळगाव-जोगा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये ओतूर येथील शरदचंद्र पवार इंजिनिअरिंग कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोघेजण मुंबईचे तर दोघे जण पुण्याचे आहे. शुभम हांडे, सिद्धांत भोर हे दोघे मुंबईचे आहे तर मयुर गाडे आणि अभिजित येंडे हे दोघे पुण्याचे आहे. एकूण चौदा विद्यार्थी पोहायला गेले असताना त्यातले चार विद्यार्थी बुडून मृत्यू झाला. हे सगळे विद्यार्थी व्हॅलेंटाईन डेनिमित्त सहलीसाठी गेले होते.

close