जळगाव महापालिकेत भाजपचा राडा

February 14, 2011 8:39 AM0 commentsViews: 6

14 फेब्रुवारी

जळगाव महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या कार्यालयात आज भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली. वाढीव पाणीपट्टीच्या मुद्यावर भाजप कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. यामध्ये भाजपचे नगरसेवक, गटनेते सहभागी होते.स्थायी समिती कार्यालयाची काचा फोडल्या. कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त आणि महापौरांच्या दिशेने हातातील काळ्या पिशव्या फेकून मारल्या. या तोडफोडीला जैन- खडसे वादाची किनार आहे. सध्या पालिकेत सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वातील खान्देश विकास आघाडीची सत्ता आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्यातील राजकीय वादाचे पडसाद म्हणून ही तोडफोड झाल्याचं बोललं जातं आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर दोनही नेत्यांदरम्यान एकमेकांवर प्रहार सुरु आहेत. मात्र यात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

close