विदर्भातल्या शेतकर्‍यांसाठी नितीन गडकरींचा पुढाकार !

February 14, 2011 8:46 AM0 commentsViews: 1

14 फेब्रुवारीविदर्भातल्या शेतकर्‍यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हंटलं आहे. नागपुरात गडकरी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या शेतकर्‍यांबाबत कार्यक्रमाची माहिती दिली. नागपुरात राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. ही प्रदर्शनी 4 ते 11 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहे. यात सर्व कृषीतज्ञ सहभागी होणार आहे. या प्रदर्शनात 5 लाख शेतकर्‍यांनी सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं गडकरी म्हणाले.

close