सांगलीत शिवसेनेचा व्हॅलेंटाईन डे ला विरोध

February 14, 2011 2:07 PM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारी

व्हॅलेंटाईन डे म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं कारण देत शिवसेनेनं सांगलीत या दिवसाला विरोध केला. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत गटबाजीमुळे मिरज शहरात शिवसेनेच्या तीन गटांनी वेगवेगळी आंदोलन केली. शिवसेना महिला आघाडीच्यावतीने श्रीकांत चौकात शुभेच्छा कार्डांची होळी केली. शिवसेना मिरज शहराच्यावतीने किसान चौकात शुभेच्छा कार्डापासून मोठे हार्टचे चित्र बनवून ते जाळण्यात आले. यावेळी निदर्शने करुन घोषणाबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे युुवा सेनेमुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांचा आवाज क्षीण झाल्याचंही चित्र दिसले. त्यातच अंतर्गत गटबाजीमुळे वेगवेगळी आंदोलन ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.

close