स्पेक्ट्रम प्रकरणी रतन टाटा अडचणीत येण्याची शक्यता

February 14, 2011 8:59 AM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाऴ्या प्रकरणी रतन टाटा अडचणीत येण्याची शक्यता आहे. टाटा यांनी करुणानिधी यांना लिहीलेलं पत्र आयबीएन नेटवर्कच्या हाती लागलं आहे. या पत्रात रतन टाटा यांनी ए राजा यांच्या कार्यक्षमतेचं आणि त्यांच्या टेलिकॉम धोरणाचे कौतुक केले आहे. करुणानिधी यांनी आपल्याला अशा प्रकारचं पत्र मिळालं असल्याचं नाकारलं. पण या पत्रात राजा यांच्या स्पेक्ट्रम वाटण्याच्या धोरणाची प्रशंसा करण्यात आली आहे. द्रमुकचं हे सर्वात मोठं यश असल्याचं रतन टाटांनी म्हटलं आहे. कॉर्पोरेट लॉबीस्ट नीरा राडिया यांच्या मार्फत हे पत्र पाठवत असल्याचा उल्लेख या पत्रात रतन टाटा यांनी केला आहे.

close