निर्यात बंदी विरोधात शेतकर्‍यांचं शोले स्टाईल आंदोलन

February 15, 2011 10:35 AM0 commentsViews: 8

15 फेब्रुवारी

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड तालुक्यात कांद्याची निर्यातबंदी हटवण्यासाठी शेतकर्‍यांनी आंदोलन केलं आहे. निर्यातबंदी हटवण्याच्या मागणीसाठी कानमंडाळे गावात 19 शेतकर्‍यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. त्यामुळे प्रशासनाची धावपळ झाली. अखेर तहसीलदार आणि आमदारांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी या शेतकर्‍यांनी केली आहे.

close