सोलापूरमध्ये कांदा आंदोलक शेतकर्‍यांना मारहाण

February 14, 2011 2:42 PM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारी

कांद्यावरील निर्यांतबंदी उठवावी या मागणीसाठी आज कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलाव प्रक्रिया बंद पाडण्यात आले. यादरम्यान व्यापारी आणि शेतकर्‍यात बाचाबाची झाली. त्यात व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांना मारहाण केली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. शेतकर्‍यांनी शनिवारी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवायला सांगितलं. या मारहाणीत एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी जवळपास 150 शेतकर्‍यांना ताब्यात घेतले आहे.

close