मुंबईत दुधाच्या दरात वाढ

February 15, 2011 10:36 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी

पुण्यात काही दिवसांपूर्वी खाजगी दुधात तीन रूपयांनी दरवाढ करण्यात आली होती आता त्या पाठोपाठ मुंबईतही दुधाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. गोकुळच्या म्हशीच्या दुधात तीन रुपयांनी तर गाईच्या दूधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. तर महानंद आणि अमूलच्या दूध दरात एकएक रुपयाने वाढ झाली आहे. उद्यापासून ही दूध दरवाढ लागू होणार आहे.

close