ऑस्ट्रेलियाला हरवून भारताची विजयी सलामी

February 14, 2011 9:51 AM0 commentsViews: 2

14 फेब्रुवारी

पहिल्या सराव सामान्यात काल रविवारी भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 38 रन्सनी पराभव केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 215 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटतं असतानाच भारताच्या स्पिनर्सनं दमदार कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियाला 176 रनवर ऑलआऊट केलं. भारतातर्फे पियुष चावलाने 4 तर हरभजनने 3 विकेट घेतल्या. त्यापूर्वी धोणीनं टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली. पण सेहवागचा अपवाद वगळता इतरांनी मात्र निराशा केली. सेहवागने सर्वाधिक 54 रन केले. तर युसुफचे 32 आणि आर अश्विनच्या 25 रनमुळे भारतीय टीमने दोनशे रनचा टप्पा ओलांडला. या मॅचसाठी भारताने सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांना विश्रांती दिली होती. भारतीय टीमची हा पहिला सराव सामना होता. तर येत्या 19 तारखेला भारतीय टीम बांगलादेश विरुद्ध आपली पहिली मॅच खेळणार आहे.

close