कोल्हापूर महानगरपालिकेत मनसेची निदर्शन

February 15, 2011 10:45 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी

कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करवाढीच्या निषेधार्थ मनसेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करत पत्रक सभेत भिरकावली. कोल्हापूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेत पाणीपट्टी 11 टक्के करवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्यावतीने ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी सर्वसाधारण सभेत प्रेक्षक गॅलरीतुन निदर्शन केली आणि घोषणाही दिल्या. त्याचबरोबर जाब विचारणारी पत्रक थेट सभेत भिरकावली. तर भाजप सेनेच्या नगरसेवकांनी वेळेवर सभा सुरु न झाल्याने निषेध नोंदवत सभात्याग केला.

close