नागपुरात होणार वन डे टीमची निवड

November 5, 2008 11:55 AM0 commentsViews: 5

5 नोव्हेंबर नागपूर,इंग्लंडविरुध्दच्या पहिल्या तीन वन डे टीमची निवड नागपुरात होणार आहे. सचिन तेंडुलकर वन डे खेळण्यासाठी सज्ज झालंय. आपण वन डे खेळवण्यासाठी फिट असल्याचं सचिननं निवड समितीला कळवलंय. श्रीलंकेविरुध्दच्या वन डे सिरीजमधून सचिननं दुखापतीमुळे माघार घेतली होती. पण आता इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या तीन वन डे साठी तो खेळू शकतो. नागपुरात वन डे टीम निवडण्यात येणार आहे. तसंच हरभजनसोबत दुसरा स्पिनर म्हणून अमित मिश्राची निवड जवळ जवळ पक्की समजली जात आहे. युवराजच्या फॉर्मबद्दल निवड समितीनं चिंता व्यक्त केली असली तरी त्याची निवड नक्की समजली जातेय. झहीर आणि इशांत शर्मा यांच्यापैकी एकाला वन डे सिरीजसाठी विश्रांती देण्यात येईल.

close