अशोक चव्हाणांची चौकशी होण्याची शक्यता

February 14, 2011 3:48 PM0 commentsViews: 3

14 फेब्रुवारी

आदर्श घोटाळाप्रकरणी अशोक चव्हाण यांची सीबीआय लवकरच चौकशी करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणातील आरोपी कन्हैय्यालाल गिडवाणी आणि आर.सी.ठाकूर यांनी चौकशी दरम्यान अशोक चव्हाण यांचं नाव घेतलं आहे. कन्हैय्यालाल गिडवाणी यांच्या 30 पानी जबाबात बरीच माहिती उघड झाल्याचं समजतं आहे. 15 टक्के करमणुकीचं मैदान दाखवण्याच्या बदल्यात अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांना आदर्शमध्ये फ्लॅट देण्यात आल्याचे गिडवाणी आणि ठाकूर यांनी चौकशीत मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

close