निवृत्त पोलिसांची हक्काच्या घरासाठी पाहावी लागते वाट !

February 14, 2011 4:11 PM0 commentsViews: 7

गोविंद तुपे, मुंबई.

14 फेब्रुवारी

पोलीस दलाच्या बळकटीकरणाच्या नुसत्याच गप्पा मारणारे गृहखातं पोलिसांच्या अनेक समस्यांवर मात्र मूग गिळून गप्प आहे. निवृत्त झाल्यानंतरही अनेकांना हक्काच्या घरासाठी वाट पहावी लागत आहे.

आयुष्याच्या शेवटच्या दिवसात तरी हक्काचं घर मिळेल या आशेनं आला दिवस ढकलणारे आण्णा कांबळे. 1994 मध्ये राज्य सरकारनं बीडीडी चाळीतल्या गव्हर्मेंट क्वॉटर्समधली घरं तिथं राहणार्‍या सरकारी कर्मच्यार्‍यांच्या नावावर करण्याचा जी आर काढला. पण आज-उद्या करत-करत आज पंधरा वर्षे उलटून गेली तरी त्यांना हक्काचं घर मिळालेलं नाही. आयुष्यभर पोलिस खात्यात नोकरी करून अशा हजारो आण्णा कांबळेंना आज आयुष्याचा शेवट फूटपाथवर काढण्याची वेळ आली. निवृत्त पोलीस कर्मचारी आण्णा कांबळे म्हणता की, तिसर्‍या दिवशी त्यांनी माझं सामान घरातून बाहेर काढलं एकाला एक आणि इतरांना दुसरा न्याय असं का? असा सवाल आण्णा यांनी उपस्थित केला. तर अशा हजारो पोलिसांच्या पत्नींनीच आता आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. 1994 च्या जी आर नुसार सर्व सरकारी कर्मच्यार्‍यांना घरं मिळाली. मात्र पोलीस यापासून वंचितच असल्याचा सवाल करत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली. एरवी पोलीस दलाच्या सक्षमीकरणासंदर्भात मोठमोठ्या गप्पा मारणारे गृहमंत्री आता का मूग गिळून का गप्प बसलेत असा सवालही केला जात आहे. राज्यसरकारची पोलिसांबाबतची ही अनास्थाचं अनेक गैरमार्गांना आमंत्रण देत आहे. याचा सरकारनं वेळीच विचार करायला हवा अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

close