शिर्डीत भरते उघड्यावर शाळा !

February 15, 2011 10:57 AM0 commentsViews: 4

15 फेब्रुवारी

एकीकडे शिर्डीत पैशांचा महापूर वाहतोय तर दुसरीकडे मात्र ज्ञानदानासारख्या कामासाठी पैसे नाहीत. शिर्डीत 1964 मध्ये स्थापन केलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था झाली आहे. मूलभूत सुविधांपासून ही शाळा वंचित आहे. या शाळेतील विद्यार्थी आजही उघड्यावर शिक्षण घेत आहे. या भागातल्या बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. मात्र त्यांच्याच परिसरातल्या या शाळेची दुरवस्था त्यांना दिसत नाही. साई संस्थाननंही या शाळेकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

close