अती क्रिकेटच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला- धोणी

February 15, 2011 11:13 AM0 commentsViews: 3

15 फेब्रुवारी

अती क्रिकेटमुळे टीमचं मनोबल कायम राखणं कठीण जातंय अशी टीका भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणाने जाहीरपणे केली होती. पण आता मात्र आपण असं काही म्हटलंच नसल्याचं धोणीने सांगितलं आहे. उद्या भारताची दुसरी प्रॅक्टीस मॅच चेन्नईला होणार आहे. त्यासाठी धोणीची पत्रकार परिषद चेन्नईत झाली. मी म्हटल्याचा अर्थ चुकीचा काढला गेल्याचे धोणीने यावेळी सांगितले आहे.

close