शिक्षक जनगणनेच्या कामावर ; पालक संतप्त

February 14, 2011 10:25 AM0 commentsViews: 2

गोविंद तुपे, मुंबई

14 फेब्रुवारी

मुंबई महापालिकेच्या शाळांना जनगणनेसाठी सुट्टी देण्यात आली. याचा फटका शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांनाही बसत आहे. ऐन परीक्षेच्या तोंडाववर ही सुट्टी देण्यात आल्यानं पालकांमध्येही नाराजी आहे. परीक्षा तोंडावर आल्यात पण मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करण्याची गडबड नाही. कारण मुंबई महापालिकेने जनगणनेच्या दुसर्‍या टप्प्याच्या कामांसाठी शाळांना 20 दिवस दिली आहे. मात्र ऐन परीक्षेच्या तोंडावर ही सुट्टी दिल्यानं पालक संतापले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात खाजगी विनाअनुदानित, अनुदानित आणि महापालिकेच्या मिळून एकूण 2400 शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकवणार्‍या शिक्षकांची संख्या 26 हजारांच्या घरात आहे आणि विद्यार्थी आहेत तब्बल 19 लाख. शिक्षक संघटनांनीही सरकारच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.

सरकारच्या याबाबत लोकांच्या मनात संताप आहे. काही शाळांना यामध्ये सामील करण्यात आलं तर काहीना वगळण्यात आलं आहे आणि त्यातच महत्त्वाचं असणार वध्यपणाच काम बाजूला राहत आहे. शिक्षकांवर शिकवणाऐवजी इतर कामाचा बोजा वाटत आहे. जनगणना ही राष्ट्रहिताचं काम आहे. पण त्याचा भार फक्त शिक्षकांवर टाकण्याऐवजी पर्याय शोधले पाहिजेत असं मत शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहे.

जनगणनेची जबाबदारी शिक्षकांवर टाकताना उद्याचे नागरिक घडवायची जबाबादारीही त्यांच्यावरच असते हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच सरकारी कामकाजामध्ये त्यांना किती अडकवायचं याचा विचार झाला पाहिजे असं मत व्यक्त होतं आहे.

close