औरंगाबादमध्ये नळाला दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिक संतप्त

February 14, 2011 5:16 PM0 commentsViews: 6

14 फेब्रुवारी

औरंगाबाद शहरातील जयभीमनगर भावसिंगपुरा भागात नळाला पंधरा दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. गाळून तर सोडाच पण उकळून प्यायच्या लायकीचे नसलेले हे पाणी अनेकांच्या घरात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही महानगरपालिका प्रशासन दुरूस्ती करीत नाही. या भागातील स्वच्छतेची कामेही होत नाहीत. जयभीमनगर भावसिंगपुरा भागाचे नगरसेवक कृष्णा बनकर यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनीेमी काही करू शकत नाही, असं सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला विनंती केली. त्यावरही त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे.

close