नांदेडमध्ये गाडीच्या स्फोटात शेजारच्या तीन गाड्या जळून खाक

February 15, 2011 11:42 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी

नांदेडच्या श्रीनगर भागातील बाजारपेठेत दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका गाडीत स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की ही गाडी बाकीच्या दोन गाड्यांवर पडली आणि तीन गाड्या जळून खाक झाल्या. या तिन्ही मारुती कार होत्या. भाग्यनगर पोलिस स्टेशनसमोरच ही गाडी उभी होती. स्फोटाचं कारण अजून कळलेलं नाही. फायर ब्रिगेडच्या दोन गाड्यांनी ही आग विझवली. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहे.

close