मराठी संस्कृती उत्तर भारतीयांच्या घरात नांदतेय

November 5, 2008 2:51 PM0 commentsViews: 15

5 नोव्हेंबर, मुंबईअलका धुपकरउत्तरप्रदेशमधून मुंबईमध्ये कामानिमित्त आलेली अनेक माणसं आज मुंबईकर झालेत. परप्रांतीय, स्थलांतरित या सगळ्या शिक्क्यांमध्ये ते कुठेच बसत नाहीत.अशा मुंबईकरांची विशेष दखल घेऊन आयबीएन-लोकमतने त्यांना केलेला हा सलाम.भांडुपच्या प्रतापनगरमध्ये राहणार्‍या भरत तिवारी यांच्या कुटुंबाची एक वेगळीच कथा आहे. तिवारींचे वडील अयोध्याप्रसाद तिवारी 1955 मध्ये उत्तरप्रदेशातून मुंबईत स्थायिक झाले. वडिलांबाबत बोलताना भरत तिवारी म्हणाले, मुंबईत आल्यावर त्यांनी बर्फाचे गोळे वगैरे विकण्यापासून सगळी कामं केली आणि ते मुंबईकर झाले '. भरत आणि त्यांच्या दोन्ही भावांचं शिक्षण मुंबईत झालं. विशेष म्हणजे तिघा मुलांनी लग्न केलं. ते निराधार मराठी मुलींशी. ' माझ्या मिसेसचे वडील नव्हते. तिची आई धुणी-भांडी करायची. पण वडिलांच्या सांगण्यावरुन आम्ही लग्न केलं ', असं भरत तिवारी सांगत होते. तिवारी याचं घर आता पूर्ण मराठमोळं झालंय. सगळे मराठी सणही त्यांच्याकडे साजरे होतात. ' ज्या मातीने आम्हाला आसरा दिला त्याचे ऋण आम्ही कधीच विसरणार नाही, असं तिवारी मराठी मातीशी नातं सांगतात.

close