पत्रकारांवर हल्ला करणारे गुंड अजुनही फरार

February 14, 2011 4:32 PM0 commentsViews: 10

14 फेब्रुवारी

नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यामध्ये पत्रकारांना आणिगावकर्‍यांना मारहाण करणारे वाळु माफिया पोपट शिंदे आणि सतिश शिदे अजुनही फरार आहेत. बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे आमदार सुरेश धस यांचे ते कार्यकर्ते आहेत. कर्जत तालुक्यातल्या नागलवाडी गावात ते बेकायदेशीररित्या वाळुचा उपसा करताहेत ही तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या नागलवाडीच्या ग्रामस्थांवर आणि पत्रकारांवर त्यांच्या गुंडांनी हल्ला केला. यामध्ये आयबीएन लोकमतचे रिपोर्टर साहेब कोकणे यांच्यासह इतर पत्रकारांना मारहाण करण्यात आली तसेच त्यांचे कॅमेरे फोडण्यात आले. राजकीय वरदहस्त असल्यानेच ही गुंडगिरी सुरू असल्याचे बोललं जातं आहे.

close