स्पेक्ट्रम प्रकरणी अनिल अंबानींची चौकशी होणार !

February 16, 2011 11:28 AM0 commentsViews: 16

16 फेब्रुवारी

टू जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी अनिल अंबानी यांची आता चौकशी होणार आहे. अनिल अंबानींनी सीबीआयच्या मुख्यालयात हजर राहण्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. ज्या ऑपरेटर्सना स्पेक्ट्रम वाटप झालं आहे त्यांची पात्रता तपासण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले होते. त्यानुसार सीबीआयने अनिल अंबानी यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. दरम्यान एडीएजीनं याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. अनिल अंबानी यांची एडीएजी ही कंपनी आहे. स्वान कंपनीमध्ये आपली कुठलीही भागीदारी नाही असं स्पष्ट करत टेलिकॉमच्या प्रश्नावर अनिल अंबानी यांनी आपली बाजु मांडली असल्याचं एडीएजीनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान या काही दिवसांपूर्वी टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा फायदा उठवणार्‍या टेलिकॉम कंपन्यांवर काय कारवाई करण्यात आली याची विचारणा सुप्रीम कोर्टानं सीबीआयकडे केली होती. तसेच डीबी रिऍल्टीजचे शाहीद बलवा यांच्या अटकेनंतर डीबी ग्रुप आणि अंबानी ग्रुप यांचे हितसंबंधही उघड झाले.

संसदेत याआधीच मांडण्यात आलेल्या कॅगच्या अहवालानुसार अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपला या टू जी स्पेक्ट्रंम वाटपाचा फायदा झाला. डीबी रिऍल्टीजचे शाहीद बल्वा यांच्या अटकेनंतर आता डीबी ग्रुप आणि अंबानी ग्रुप यांचे हितसंबंध उघड झाले आहेत. कॅगच्या अहवालात एडीएजी चं नाव स्पष्टपणे घेण्यात आलं आहे. रिलायन्स टेलिकॉमने कायदे धाब्यावर बसवले असा ठपका ठेवण्यात आला आहे.

- रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडचे स्वान टेलिकॉममध्ये 10 टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे त्यांचा अर्ज बेकादेशीर ठरतो.

- मार्च 2007 13 सर्कलमध्ये स्वाननं परवान्यांसाठी अर्ज केला तेव्हा रिलायन्स टेलिकॉम लिमिटेडचा त्यात सहभाग होता.

- याबद्दल कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयानं चौकशी करणं आवश्यक होतं

- पण स्वान डिसेंबर 2007 मध्ये स्वानला सुधारित अर्ज करायला लागण्यात आलं. तोपर्यंत अर्जाची मुदतही संपली होती.

स्वान टेलिकॉमनं इटिस्लॅट ग्रुपला त्यांचे 45 टक्के शेअर्स विकले आणि हजारो कोटींचा नफा कमवला. इटिस्लॅट नंतर इटिस्लॅट डीबी झालं. यामध्ये कॉमन फॅक्टर होते खुद्द अनिल अंबानी. सुप्रीम कोर्टाने एडिएजी ग्रुपचं नाव या घोटाळ्यात घेतल्याने आता अनिल अंबानींसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.

close