केटरिंगमध्ये भ्रष्टाचाराचा कलमाडींवर ठपका !

February 15, 2011 1:12 PM0 commentsViews: 8

15 फेब्रुवारी

कॉमनवेल्थ गेम्समधल्या केटरिंग कंत्राटामध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका शुंगलू समितीकडून सुरेश कलमाडी यांच्यावर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या खेळादरम्यान 93 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आलं होतं. पण कॉमनवेल्थ गेम्सच्या चार महिने उरलेले असताना त्यावर कोणताही शिक्कामोर्तब झालेला नव्हतं अशी माहिती चौकशी दरम्यान समितीला मिळाल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. या सगळ्या प्रकाराला सुरेश कलमाडीच जबाबदार असल्याचा आरोप केटरिंग इन्चार्ज जिजी थॉमसन यांनी शुंगलू समितीला चौकशीदरम्यान सांगितलं. डेलवेअर नॉर्थ या कंपनीला केटरिंगचे कंत्राट देण्यासाठी 30 लाख रुपये अनामत रक्कम जमा करण्यासही कलमाडींनी सांगितलं होतं. असं चौकशी दरम्यान समितीला आढळलं आहे. परंतु स्पर्धेला केवळ चार महिने उरलेले असताना सुरेश कलमाडी अशाप्रकारची सूचना करु शकत नाहीत असा ठपका आपल्या अहवालात ठेवला आहे. याबाबत सर्वप्रथम आयबीएन नेटवर्कनं हे प्रकरण उघडकीस आणलं होतं.

कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमधलं चकचकीत किचन. या ठिकाणी स्पर्धेतल्या हजारो खेळाडूंनी भोजनाचा आस्वाद घेतला. आशियामधलं सर्वात मोठं किचन असं ते नावाजलं गेलं.सर्वात मोठ फ्रीजही इथं होतं. आता या किचनमधल्या सगळ्या सोयीसुविधा ह्या मोठ्या घोटाळाच्या रुपात याच माणसाभोवती फिरत आहेत. ती व्यक्ती कॉमनवेल्थ आयोजन समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी.

- कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेल्या अनियमितता तपासण्यासाठी पंतप्रधानांनी शुंगलू समिती नेमली होती अशी माहिती आयबीएन नेटवर्कला मिळाली होती.- डेलवेअर नॉर्थ या केटरिंग कंपनीने 30 लाखाची अनामत रक्कम भरली नाही, म्हणून त्यांचं टेंडर रद्द केलं होतं. असंही आयबीएन नेटवर्कने जानेवारीत उघडकीस आणलं होतं.- या सगळ्या दिरंगाईमुळे आयोजन समितीला 5 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागल्याचा ठपका समितीने चौकशी दरम्यान ठेवला आहे.

पण ही केवळ पहिलीच केस आहे ज्यामध्ये थेट सुरेश कलमाडींना जबाबदार धरण्यात आलं आहे. क्वीन्स बॅटन रिले आणि स्पर्धेशी निगडीत इतरही प्रकरणांची अजून चौकशी सुरु आहे. त्यात त्यांना 1 लाख 46 हजार पौंडच्या नुकसानीचे आरोप त्यांच्यावर आहेत. त्यामुळे यापुढचा काळ कलमाडींसाठी तसा कठीणच आहे.

शुंगलू समितीचा ठपका

- अनामत रक्कम वेळेवर न मिळाल्याने कलमाडींनी टेंडर रद्द केलं- कलमाडींनी हे कंत्राट राखीव ठेवल्याने आयोजन समितीचे 4 महिने वाया गेले- पुन्हा टेंडर काढण्यातही खूप वेळ वाया गेला- चुकीच्या निर्णयामुळे आयोजन समितीचा खर्च 4.03 कोटी रूपयाने वाढला

close